नागपूर : वृत्तसंस्था । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कोरोनावर मात केली आहे.
उपचारानंतर बरे झाल्यानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. ९ एप्रिलला मोहन भागवत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना किंग्जवे या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी मोहन भागवत यांना पुढील पाच दिवस विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोहन भागवत महाल येथील संघ कार्यालयात परतले. तिथेच ते विलगीकरणात राहणार आहेत. दरम्यान रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत त्यांच्या सर्व चाचण्या समाधानकारक असल्याची माहिती दिली आहे.
९ एप्रिलला मोहन भागवत यांना सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर रात्रीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान उपचारानंतर सर्व चाचणींचे अहवाल समाधानकारक असल्याने मोहन भागवत यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.