सरपंच परिषदेच्या एकदिवसीय बंदला मारूळ ग्रामपंचायतीचा उस्फूर्त प्रतिसाद

यावल, प्रतिनिधी | मुंबईत सरपंच परिषदेने पुकारलेल्या एकदिवसीय ग्रामपंचायत बंदला यावल तालुक्यातील मारूळ ग्रामपंचायतीने कुलूप लावून बंद पाळल्याने उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

मुंबई येथील सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीप प्रभाकर सोनवणे व उपाध्यक्ष असद अहमद जावेद यांच्या नेतृत्वाखाली कुलूप लगावो आंदोलन मुंबई येथे पुकारण्यात आले आहे. या एकदिवसीय बंदला यावल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसह मारूळ ग्रामपंचायतीकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तत्पूर्वी राज्यातील सरपंच संघटनांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आज एक दिवसासाठी ग्रामपंचायत बंदची हाक दिली होती. या हाकेला तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांच्या एकत्रित विकास कार्यामध्ये भेडसावणाऱ्या समस्या त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत सरकार दुर्लक्ष करत आहे. या बाबीची दखल घेऊन सरपंच संघटनांनी आज ग्रामपंचायत बंदची हाक दिली आहे. त्या हाकेला साद म्हणून आज मारूळ ग्रामपंचायत पंचायत कार्यालयाला ” कुलूप लावून आंदोलनात सहभाग नोंदवला.

यावेळी सरपंच असद अहमद जावेद अली सैय्यद , उपसरपंच सलामत अली सैय्यद, पोलीस पाटील नरेश मासोळे, ग्रामपंचायत सदस्य मुर्तेजाअली सैय्यद, मुख्ताऊद्दीन फारूकी, सिताराम पाटील, मतिऊर रहेमान पिरजादे, रफतअली सैय्यद , एकनाथ पाटील, गफ्फार तडवी, झिपरु तडवी, लिपिक परवेज अख्तर सैय्यद, शिपाई सलिम सैय्यद, पाणी पुरवठा कर्मचारी शफिक उद्दीन फारूकी, सामाजिक कार्यकर्ते युवराज इंगळे व बाळू तायडे आदींनी सहभाग नोंदविला.

Protected Content