मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट सरपंच आणि नगराध्यक्षांची निवडणूक रद्द करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यासंदर्भात प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता महाविकास आघाडी सरकार हे निर्णय बदलण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पूर्वीप्रमाणे नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड होईल. तसेच कृषी बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांना मिळालेला मतदानाचा अधिकार रद्द होण्याची चिन्हं आहेत.