वरणगाव, प्रतिनिधी | सरदार वल्लभभाई पटेल हे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारे एक महापुरुष होते. त्यांचे विचार आजच्या युवकांनी आचरणात आणणे अति महत्वाचे आहे. त्याकरता सर्वांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार अंगीकारावे व आपल्या गावाचे नाव उज्वल कसे होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे असे आर. आर. पाटील यांनी केले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सुनील काळे, गोलू राणे, नटराज चौधरी, अशोक धुमाळे, विलास तायडे, जगन्नाथ चौधरी, झोपे म्याडम, भंगाळे म्याडम, डॉ. सादिक साबिर कुरेशी, मुस्लिम भाई अन्सारी, मिलिंद भैसे, किरण धुंदे, प्रभाकर पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पूजन आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा योग्य ठिकाणी बसवण्यासाठी अथक प्रयत्न करणार असून त्यासाठी परिश्रम घेण्याची सुद्धा तयारी दर्शविली. सरदार पटेल यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी व आदर्श असून सर्वांना बरोबर घेऊन चालन्याचा संदेश सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या कार्यकाळात दिला. आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने चालून विकासाच्या बरोबर राहावे त्यामुळेच वरणगावची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. वरणगाव हे महाराष्ट्रामध्ये नंबर एकचे शहर करणार असा निर्धार माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, सूत्रसंचालन मिलिंद भैसे यांनी केले. यशस्वीतेसाठी कमलाकर मराठे, मयूर गावंडे, शंकर पवार, आकाश निमकर, रमेश पालवे, मयूर गावंडे आकाश निमकर, संदीप माळी, विवेक कुलकर्णी, छगन पवार, श्री नेहते, केशव भंगाळे, योगेश चौधरी, संदीप माळी, पप्पू ठाकरे , किशोर सोनार, कमलाकर मराठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.