सरकारने कोरोना लढ्यासाठी महापालिकांना मदत करावी : देवेंद्र फडणवीस

पुणे (वृत्तसंस्था) पुणे महापालिकेने कोरोनाविरोधाच्या लढाईत आतापर्यंत जवळपास 150 कोटी रुपये खर्च केले. ते आवश्यकदेखील आहे. पण, राज्य सरकारनेदेखील महापालिकांना मदत करायला हवी, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

 

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्याचा दौरा केला. या दौऱ्यानंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमरास त्यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन तिथला आढावा घ्यावा, तिथली काय परिस्थिती जाणून घ्यावी, एखाद्या भागात काही अडचणी असतील तर त्या सरकारपर्यंत पोहोचवून सोडवण्याचा प्रयत्न करावा, या उद्दीष्टाने दौऱ्याला सुरुवात केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही महापालिकांनी मोठ्या प्रमाणात आपली संसाधने वापरुन व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न केला. पण, राज्य सरकारनेदेखील महापालिकांना मदत करायला हवी”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Protected Content