समाजसेवक पटेल यांनी स्वखर्चाने केली सार्वजनिक विहिरीची दुरुस्ती

 

यावल, प्रतिनिधी। तालुक्यातीत कोरपावली ग्रामपंचायतच्या उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांचे चिरंजीव समाजसेवक मुक्तार पिरण पटेल यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने ग्राम पंचायतीच्या विहरीवर लोखंडी पाईप लाईन टाकल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

गावातील गुर ढोर यांना मोठया प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली होती. तसेच गावात काही लग्न समारंभ असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम असो याकरीता पाण्याच्या टँकर भरण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होते. दरम्यान आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सामाजीक कार्यकर्ते मुक्तार पटेल यांनी वाढदिवसानिमित्त होणारे खर्च टाळुन या ठिकाणी लोखंडी पाईप लाईन करून योग्य ते साहित्य स्वखर्चाने आणून गावातील ग्रामस्थांना व शेतकरी, गुराखी यांना नेहमीच भेडसावणाऱ्या समस्या सोडवली. सामाजिक कार्यकर्त मुक्तार पिरण पटेल  यांनी याआधी सुद्धा स्वखर्चाने ग्राम पंचायतीच्या आर्थिक अडचणीमुळे अनेक कामे ही प्रलंबीत होती ती पटेल यांनी स्वखर्चाने करून गावाच्या विधायक कामांचे निराकरण केल्याने गावासह पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी त्यांनी राबविलेल्या गावाच्या विविध विकास कामास यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतच्या सत्ताधारी गटाचे पॅनल प्रमुख पिरण पटेल, सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील सत्तार पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, प्रवीण अडकमोल, इम्रान पटेल, समीर तडवी, सलीम तडवी ,अनस पटेल यांनी सहकार्य केले.

 

Protected Content