पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहायक आयुक्त समाजकल्याण जळगाव यांच्या वतीने १ एप्रिल २०२३ ते १ मे २०२३ दरम्यान “सामाजिक न्याय पर्व” अंतर्गत “ऊसतोड कामगारांचे पुनरागमन” शिबीर (आरोग्य तपासणी व धान्य महोत्सव) १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कृष्णनगर (तळेगाव तांडा) या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची उदघाटन महापुरुषांच्या फोटोना मंडळ अधिकारी विनोद कुमावत, पुरवठा निरिक्षिका एम. एस. देवरे, वैद्यकीय आधिकारि डाॅ. संदिप चव्हाण, समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे, तलाठि डोंगरदिवे, रेशनिंग दुकानदार सांघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश शेलार, उपक्रमशील शिक्षक धृवास राठोड, उपसरपंच मनोज चव्हाण, माजी सरपंच संतोष राठोड, प्रकाश चव्हाण, अनिल राठोड, उमेश भोसले, जितेन्द्र देवरे आदि मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन करण्यात आले.
समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अभिनव संकल्पनेतुन महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने १ एप्रिल ते १ मे २०२३ असा तब्बल एक महिना “सामाजिक न्याय पर्व”हा उपक्रम राबविला जात आहे.जळगाव जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन. याच अनुषंगाने उसतोड कामगारांचे पुनरागमन शिबीर घेण्यात येवुन उसतोड कामगारांना मान्यवरांच्या हस्ते धान्याचे किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळ अधिकारी विनोद कुमावत, पुरवठा निरीक्षिका एम. एस. देवरे, तलाठी डोंगरदिवे, उपक्रमशील शिक्षक धृवास राठोड यांची यथोचित भाषणे झालीत.
याप्रसंगी तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. संदिप चव्हाण आणि त्त्यांच्या टिमकडुन ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अनेक ऊसतोड कामगारबांधवानी ऊसतोड कामगारांच्या पुनरआगमन स्वागताचा असा कार्यक्रम घेतल्याचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविकात समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी समाजकल्याण विभागाकडुन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत व विभागाच्या विविध योजनेबद्ल माहिती सांगितली. सुञसंचलन श्रीराम राठोड यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपसरपंच मनोज चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक साळुंखे, अमोल चव्हाण, चेतन भोसले, सागर योगेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. तर सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार व कृष्णनगर आणि तळेगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.