जळगाव, प्रतिनिधी । विरोधकांनी स्थायी सभा उधळून लावण्याच्या वल्गना केली होती. मात्र, आजच्या सभेत सर्वांमानते निर्णय मान्य झाले त्याचातूनच त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य नव्हते असे दिसून येते असे सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी सांगितले. विरोधी पक्षाचे तीन सदस्य स्थायी सभेत आहेत व ते तिघेही आज हजर होत अशी पुष्टीही त्यांनी जोडली. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच ही सभा घेण्यात आली असल्याचे सभापती ऍड. हाडा यांनी सांगितले.
आज स्थायी समितीची एक स्थगीत व दुसरी नियमित सभा बोलविण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीने केली होती. मात्र, स्थायी सभापती यांनी अजेंडावरील विषय पत्रिकेसंबंधित अधिकाऱ्यांना सभागृहात प्रवेश देउन ही सभा पार पडली. आज २०मार्च रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहकूब करण्यात आली होती ती व दुसरी नियमित सभा घेण्यात आली. प्रथम आकरा वाजता तहकूब सभेत चार विषय होते. यात आंबेडकर उद्यानाचा विकासाचा विषय यानंतर लेखा परीक्षण व सविधानांची माहिती घेण्यात आली. यानंतर नियमित सभेत ९ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. उमाळा जलशुद्धीकरण केंद्रास तुरटीचा विक्रम केमिकल नाशिक यांना पुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना व पावसाळाच्या पार्श्वमीवर नाले सफाई मुद्यांवर चर्चा करून प्रशासनास सूचना देण्यात आल्या. सफाईचा ठेक्याबाबत चर्चा होऊन यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा व सध्या ज्या पद्धतीने काम सुरु आहे त्यास वेळमर्यादा घालून देणे आवश्यक असल्याचे यावेळी ठरले.
आजच्या सभेत सभापतींनी पत्रकारांना प्रवेश नाकारला होता. यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी हा निर्णय योग्य नव्हता असे मत मांडले. लढ्ढा यांनी पुढे सांगितले की, शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांनी सभागृहात बराचश्या जागा रिक्त असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही उलंघन होणार नाही असा मुद्दा मांडला. परंतु, सभागृहात कोणाला बसू द्यायचे याचे अधिकार सभापतींना असल्याने त्यांनी तो निर्णय घेतला. लढ्ढा यांनी पत्रकार व छायाचित्रकारांना सभागृहात बसू द्यावी अशी त्यांची इच्छा होती असे त्यांनी सांगितले.
सभागृहात उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक असल्याने कमीत कमी गर्दी तेथे ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वमूमीवर हे करणे आवश्यक असल्यानेच पत्रकारांना सभागृहात येण्यास मज्जाव करण्यात आला होता, याबाबत मी सभा सुरु होण्यापूर्वीच पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केली असल्याचे सभापती ऍड. हाडा यांनी सांगितले. दरम्यान, नगरसेवक कैलास सोनवणे हे स्थायी समितीचे सदस्य नसतांना सभागृहात उपस्थित होते.