सावदा, प्रतिनिधी | सावदा शहरातील सफाई कामगाराचे प्रश्न व समस्यांचे निवारण करण्यात यावे अशी मागणी बेटी बचाओ बेटी पाढाओ जळगाव जिल्हा संयोजक सारिका चव्हाण यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सावदा नागपालिकेच्या अंतर्गत काम करणारे निरक्षर सफाई कामगारांना मिळणारी १२ वर्षे सेवेनंतर मिळणारी कालबद्ध पदोन्नती बऱ्याचश्या निरक्षर कामगारांना मिळालेली नाही आहे. इतर काही नगरपालिकेमध्ये शासनाच्या जी.आरनुसार व स्थानिक प्रशासनाच्या माध्यामातून ही योजना निरक्षर सफाई कामगारांना लागू करण्यात आलेली आहे. तरी आपण इतर नगरपालिकेचा संदर्भ मागवून ह्या निरक्षर कामगारांना न्याय द्यावा तसेच डॉ. बाबा साहेब आंबेडकर आवास योजनेतून सफाई कामगारांना श्रम साफल्य आवास योजने अंतर्गत मिळणारे आवास प्रकरण मागील वर्षापासुन प्रलंबित आहे. ते लवकरात लवकर मार्गी लावावे. तसेच २५ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या सफाई कामगाराना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजने अंतर्गत मिळणारे आवास प्रकरण मागील १० ते १२ वर्षापासून प्रलंबित आहे ते लवकरात लवकर मार्गी लावावे. सफाई कामगार रहिवास असलेली मेहतर कॉलनी येथे प्रेवश व्दार बांधून त्यावर (श्री रामेदव बाबा नगर ) नाव टाकण्यात यावे. सफाई कामगारांमाठी वैवाहिक व धार्मीक कार्यक्रमासाठी एक मोठे मंगल कार्यालय बांधून मिळावे. सफाई कामगारांना दरवर्षी गणवेश व सफाई उपकरणे, साहीत्य मिळावे, सफाई कामगांराचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी सारिका चव्हाण यांनी केली आहे.