जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रतापनगर परीसरात चोरीप्रकरणात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपीस बुलढाणा येथून अटक केली.
शहरातील प्रताप नगर परीसरात संशयित आरोपी संजय गुलाब पवार (वय-37, रा.पाघरी ता. शिंदखेडाराजा जिल. बुलढाणा) चोरी केली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात भाग 5 गुरनं 103/2003 भादवि 381 गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ.रविंद्र पाटील यांना गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी संजय पवार याला राहत्या घरातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.