अहमदनगर (वृत्तसंस्था) आर्थिक घोटाळ्यातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना पत्र देणाऱ्या सचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवून सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जनतेला दिलासा देण्यापेक्षा काही मंत्री स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. संबंधित अधिकाऱ्याने त्यांनी बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन पत्र दिले हे सत्य जनतेसमोर यायला हवे. कारण हा लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. सामान्य माणसाला घराबाहेर पडायला परवानगी नसताना श्रीमंताच्या सहलीला थेट पास मिळतो आहे, अशी परिस्थिती आहे. अशी परवानगी देण्याचे धाडस सचिवात नाही. त्यांनी कोणत्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरुन हे पत्र दिले? हे सत्य जनतेसमोर यायला हवं, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.