अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत सरकारच्या युवा मंत्रालय व लोकसभा सचिवालय आयोजित दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ॲड. सारांश सोनार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते संसदेच्या सेन्ट्रल हॉल मध्ये बाजजेयी यांचे बद्दल विचार मांडणार आहेत.
भारत सरकारच्या युवा मंत्रालय व लोकसभा सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये रविवार २५ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमाला महाराष्ट्रातून एकमेव अमळनेर जि. जळगाव येथील युवावक्ते ॲड. सारांश धनंजय सोनार हे निमंत्रित आहे. ते सदरील कार्यक्रमात आपले भाषण करणार आहे. नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेशी संबंधित देशभरातील २५ तरुणांना या कार्यक्रमाचे निमंत्रण प्राप्त झाले असून देशातील २५ तरुणांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकमेव अमळनेर येथील ॲड.सारांश सोनार याची निवड झाली आहे. ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे . या कार्यक्रमात सारांश अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आपले मनोगत हिंदीतून मांडणार आहेत .
आपल्या प्रभावी अभ्यासु वक्तृत्व व कर्तुत्वाच्या बळावर चमकदार कामगिरी करत असलेले ॲड.सारांश सोनार यांने यापूर्वीच राज्य पातळीवरील शेकडो वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावलेली आहेत . विधीज्ञ असलेले सारांश हे संसद भवनात दिल्ली येथील शासकीय कार्यक्रमात सहभागी होऊन राज्याची व जळगाव जिल्ह्याची व महाराष्ट्राची मान उंचावत आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या या तरुणाला संसद सचिवालयाच्या वतीने मोफत विमान प्रवास, तीन दिवसीय वेस्टन कोर्ट येथील शासकीय निवास व इतर सोय व आणि देशाच्या संपूर्ण सर्वोच्च सभागृहात संपन्न होणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात भाषणासाठी निमंत्रण, या बाबी इतर नवतरुणांना प्रेरित करणाऱ्या आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल जेष्ठ ॲड. एस.आर. पाटील, ॲड. रमाकांत माळी, डिगंबर महाले, प्रा.डॉ. विजय घोरपडे, प्रा.डॉ.लीलाधर पाटील, प्रा.डॉ.संदीप नेरकर, प्रा. नितीन पाटील, दिलीप सोनवणे, इंद्रवदन सोनवणे, भैयासाहेब मगर, प्रा. एस.ओ. माळी, सतीश देशमुख, प्रा. अशोक पवार, संदीप घोरपडे, सहायक फौजदार बाळकृष्ण शिंदे, डॉ.रवींद्र चौधरी, आ.अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह शहर व तालुका पत्रकार बांधव, सुवर्णकार समाज यांचे वतीने सारांश धनंजय सोनार यांचे अभिनंदन करण्यात आले.