संसदेच्या नवीन इमारतीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाची परवानगी

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । संसदेच्या नवीन इमारतीलच्या बांधकामाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असून यामुळे आता या भव्य वास्तूच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या या प्रोजेक्टसंबंधी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्राने भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. मात्र यावेळी कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली होती. सोबतच न्यायालयातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश दिले होते.

सुप्रीम कोर्टाने आज यासंबंधी निर्णय दिला आहे. कोर्टाने प्रोजेक्टचा मार्ग मोकळा केला असून नव्या इमारतीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारकडे बांधकामासंबंधीची सर्व कागदपत्रं योग्य असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

Protected Content