संविधानातील ५०० कलम तोंडपाठ असणाऱ्या चिमुकलीचा सत्कार

 

जळगाव, प्रतिनिधी । जनमत प्रतिष्ठान व दिशा  स्पर्धा परिक्षा यांच्या तर्फे आज भारतीय संविधानाचे ५०० कलम तोंडीपाठ असलेली इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी अलिजा मौजे मुजावर हिचा सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

शिव कॉलनी येथील रहिवासी इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी अलिजा मौजे मुजावर संविधानाचे ५०० कलम तोंडीपाठ केली आहेत. भविष्यात आपणास आईएएस ऑफिसर व्हायचे आहे असे तिने सांगितले. अलिजा मौजे मुजावर हिस प्रोत्साहन मिळावे यासाठी तिचा जनमत प्रतिष्ठान व दिशा  स्पर्धा परिक्षातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुदर्शन पाटील, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, दिषा स्पर्धा परीक्षेचे उमेश सूर्यवंशी, हेमंत साळुंखे, राजेंद्र वाघमारे, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हा संघटक हर्षाली पाटील उपस्थित होते.

Protected Content