जळगाव प्रतिनिधी । येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात होळीचे नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना विविध पाना-फुलांपासून रंग कसे बनवतात त्याची माहिती दिली.
धुलीवंदनला रसायन मिश्रित रंगांचा होणारा वापर हा शरीरासाठी हानिकारक ठरत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रसायनमिश्रित रंग टाळावे आणि नैसर्गिक रंगांचा वापर करावा या उद्देशाने हि कार्यशाळा घेण्यात आली. संस्थेचे सचिव त्तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी या कार्यशाळेचे विद्यालयात आयोजन केले. मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे होणारे फायदे आणि रसायन मिश्रित रंगांमुळे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी पांढरा रंग चांदणीचे फुल व मुलतानी माती, पिवळा रंग हळद व झेन्डूंची फुले तर बीट, गुलाबापासून लाल रंग बनवला. रंग बनवणे आणि इतर रंगांची माहिती उज्ज्वला ननवरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक साधना शिरसाठ, माधुरी सपकाळे, जया पाटील, किरण पाटिल, छाया केदार,कविता बढे, गीता भावसार, आम्रपाली शिरसाठ, सरीता परदेशी, माधुरी विधुर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.