चंद्रपूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी गावात शेजारच्याने एका अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 45 वर्षीय आरोपीला अटक केली असून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
काल (शनिवार) संध्याकाळी ही मुलगी घरा बाहेर खेळायला गेली होती. थोड्यावेळाने पिडीत मुलगी रडत रडत घरी आली. मुलगी रडत घरी आल्याने आईने चौकशी केली असता तिला हा गंभीर प्रकार समजला. त्यानंतर मुलीच्या आईने तातडीने आरोपी विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.