अमरावती (वृत्तसंस्था) जिल्ह्यातल्या लोणी टाकळी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या एका गावात अडीच वर्षीय वर्षीय चिमुरडीवर एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची संतापजनक धक्कादायक घटना घडली आहे.
पिडीत अडीच वर्षाची चिमुरडी आणि बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी या दोघांचेही घर एकाच परिसरात आहे. अडीच वर्षाची पीडित चिमुकली आरोपीच्या घरी खेळायला गेली असता त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. याची माहिती मुलीच्या वडिलांना कळताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीला अटक करून बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.