संजय राऊत यांच्यामुळेच गुलाबरावांना मिळाले मंत्रीपद ! – संजय सावंत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुलाबराव पाटील हे आता संजय राऊत यांच्यावर टिका करत असले तरी त्यांना राऊत यांच्यामुळेच मंत्रीपद मिळाले होते असा गौप्यस्फोट शिवसेना-उबाठा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केला. ते शिरसोली येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

 

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आज शिरसोली येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली आहे. ते म्हणाले की, मंत्री गुलाबराव पाटील हे खासदार संजय राऊत यांच्यामुळेच मंत्री झाले आहेत. गुलाबराव हे वणीच्या सप्तशृंगी देवीचे उपासक आहेत. दर वाढदिवसाला ते नेहमीच त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात. त्यांनी देवीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं किमी संजय राऊत यांच्यामुळे मंत्री झालेलो नाही. असा आव्हान संजय सावंत यांनी गुलाबराव पाटील यांना दिला आहे.

 

आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले की, गुलाबराव पाटलांनी आपली पात्रता तपासावी आणि मग संजय राऊत यांच्यावर आरोप करावे आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो आहोत त्यांच्यावर आपण आरोप करू शकतो का हे गुलाबराव पाटील यांनी तपासावे. आणि मग निष्ठेच्या गोष्टी कराव्या असेही ते म्हणाले

 

याचबरोबर ते असेही म्हणाले की संपर्कप्रमुख म्हणून मी गुलाबराव पाटील यांच्यासोबत काम केलं आहे त्यांचे अनेक किस्से अनेक गोष्टी मला माहित आहे जर गुलाबराव पाटील शांत झाले नाहीत तर अनेक गौप्यस्फोट करतच राहील असा इशारा त्यांनी दिला.

 

शिरसोली येथे जिल्हा परिषद गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख सचिन आसबे, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, विभागीय सचिव विराज कावडीया, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, धरणगाव तालुकाप्रमुख जयदीप पाटील, रुपाली शिवदे, महिला आघाडी तालुका प्रमुख विजय लाड, भागवत पाटील, मुरलीधर रघुवंशी, राहुल बोराडे आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख उमेश पाटील यांनी केले.

Protected Content