Home प्रशासन तहसील संजय तायडे आता रावेरचे प्रभारी तहसीलदार

संजय तायडे आता रावेरचे प्रभारी तहसीलदार


 

रावेर : प्रतिनिधी । भुसावळ येथील सजंय तायडे यांना रावेरचे प्रभारी तहसिलदार म्हणून पदभार घेण्याचे आदेश आज सायंकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहे.

रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे या कोरोना पोझिटीव्ह आहेत व सद्या त्या रजेवर गेल्याने आज सायंकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रिक्त पदावर प्रभारी तहसिलदार म्हणून कामकाज पाहण्याचे आदेश काढले आहे.

सजंय तायडे यांनी रावेरला निवासी नायब तहसिलदार म्हणून काम केले आहे सद्या भुसावळ येथे निवासी नायब तहसिलदार म्हणून काम-काज बघत होते. शांत स्वभावाचे तायडे म्हणून त्यांची ख्याती आहे.


Protected Content

Play sound