चाळीसगाव, प्रतिनिधी | संजय गांधी निराधार योजनेचे नुकतीच जाहीर झालेल्या कार्यकारिणीत बंजारा समाजाचा एकही प्रतिनिधींना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे सर्व समित्या बरखास्त करून बंजारा समाजातील प्रतिनिधींची निवड करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चाळीसगाव येथील संजय गांधी निराधार योजना, आत्मा व शहर व तालुका दक्षता समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात बहुसंख्य बंजारा समाजातील एकही प्रतिनिधींना संधी मिळाली नाही. म्हणून हे बंजारा समाजावर अन्याय कारक आहे. त्यामुळे वरील तिन्ही समित्या बरखास्त करून बंजारा समाजाच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात यावे अशी मागणी तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे भटक्या विमुक्त जमाती व विजाभजा तालुकाध्यक्ष दिनकर राठोड यांनी निवेदनाद्वारे केले आहेत. दरम्यान निवेदनात वरील तिन्ही समितीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांच्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे, परंतु यात एकाही बंजारा समाजातील प्रतिनिधींची निवड करण्यात आलेली नाही. हि गंभीर स्वरूपाची बाब आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या तालुका स्तरावरील समितीमध्ये बंजारा समाजातील कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आला आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते स्व. वाडीलाल राठोड यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. व राजेंद्र राठोड यांना जिल्हा परिषद सभापती, तसेच मच्छिंद्र राठोड व दिनकर राठोड यांना भारतीय जनता पार्टीनकडून संजय गांधी निराधार समितीसाठी संधी मिळाली होती. दरम्यान
महाविकास आघाडीने एका समिती मध्येही संधी देण्यात आली नसल्याने व आघाडीने बंजारा समाजाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने प्रत्येक तांड्यांमध्ये बंजारा समाजात आघाडी बद्दल कमालीची नाराजी दिसून येत आहे. यामुळे आम्ही महाविकास आघाडीचे जाहीर निषेध करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.