यावल, प्रतिनिधी | येथील संजय गांधी समितीच्या सर्वसाधारण बैठकीचे आयोजन शहरातील तहसील कार्यालयात करण्यात आले. यावेळी पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरीत करण्यात आले.
यावल येथे संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीचे आयोजन येथील तहसील कार्यालयात आज करण्यात आले. यावेळी विविध योजनांसाठी अर्ज केलेल्यांची प्रकरणे मंजूर झाल्याने पात्र लाभार्थ्यांना मंजूरीचे पत्र वितरीत करण्यात आले. तत्पूर्वी यावल येथे संजय गांधी निराधार योजना समितीच नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशाने नुकतीच अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुका पातळीवरील या समितीची नुकतीच बैठक संपन्न होवुन अनेक दिवसापासुन मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना अखेर न्याय मिळाला , या समितीच्या बैठकीत मंजुर प्रस्तावीत प्रकरणाच्या लाभार्थ्यांना तात्काळ व सरळ माहीती मिळावी या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी आपल्या पत्राद्वारे माहीती पहोचवली आहे.
यावेळी मारूळचे सरपंच सैय्यद असद अहमद जावेद अली, पोलीस पाटील नरेश बाबुराव मासुळे , ग्राम पंचायत सदस्य सिताराम पाटील , गफ्फार तडवी , मारूळ येथील दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष हसन महारू तडवी, हसरत अली यांच्या प्रमुख उपस्थितीत आशाबाई दत्तु हटकर, दीदार अली अकबर अली , सैय्यद उमराव बेगम . एनुरबी बाबुराव तडवी , बीबी बतुल नवाज, मोहम्मद फारूक रिद्धान अली , कुलसुम बिस्मिल्ला तडवी आदी लाभार्थ्यांना मंजुरी पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.