मुक्ताईनगर, प्रतिनिधी । तालुकास्तरावर गठित करण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार समितीवर दिव्यांग बांधवांना घ्या, अशी मागणी डॉ. विवेक सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विशेष समित्यांची नियुक्ती करण्यात येत असून संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये शा.नि.क्र.विसयो-२०१८/प्र.क्र.६२/विसयोनुसार दिव्यांग व्यक्तींना सदस्यत्व देणे बंधनकारक असून जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांमधून संगायो समितीवर दिव्यांग व्यक्तींच्या नावाची शिफारस करण्यात आली नसून यामुळे शासन निर्णयाला तालुका प्रशासनाकडून व राजकीय नेत्यांकडून केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे, तरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शासन निर्णयानुसार संगायो समितीवर सदस्यत्व देण्यात यावे व ज्या तालुक्यातील संगायो समितीवर दिव्यांगांना सदस्यत्व देण्यात आले नसेल त्या समितीला मान्यता देण्यात येऊ नये ही विनंती. तसेच जिल्ह्यात शा.नि.क्रः विसयो-२०१८/प्र.क्र.६२/ विसयो या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे डॉक्टर विवेक सोनवणे यांनी केली.