भुसावळ, प्रतिनिधी । कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राहणीमान कोलमडून गेले आहे. देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र दुकाने बंद आहेत. या कालावधीत ज्यांना रोज कष्ट करून दररोज आपल्या कुटूंबाचे पोट भरावे लागते अश्या गरीब व गरजू नागरिकांची जेवणाची गैरसोय होत आहे. अशा गरजू, गरीब नागरिकांसाठी संस्कृती फाउंडेशनतर्फ ‘एक हात मदतीचा – एक हात माणुसकीचा उपक्रमा’ द्वारे जेवण वाटप करण्यात येणार आहे.
गरीब व गरजू नागरिकांची लॉक डाऊनमुळे जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी युवा क्रीडा मंत्रालय भारत सरकार ह्यांच्या नेहरू युवा केंद्र जळगांव संलग्न संस्था संस्कृती फाउंडेशन मार्फत “एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात संस्कृती फाउंडेशनचे २० स्वयंसेवक चार गटांमध्ये जाऊन गरजू लोकांपर्यंत जेवणाचे वाटप करणार आहेत. ह्यासाठी भुसावळ नगरपालिकेच्यावतीने तसेच तहसील कार्यालयामार्फत परवानगी देखील संस्थेला मिळाली आहे. तसेच ह्या कार्यासाठी दानशूर नागरिकांकडून मदत देखील स्वीकारली जाईल असे संस्था अध्यक्ष रणजितसिंग राजपूत ह्यांनी कळविले आहे.