भुसावळ ,प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता लॉक डाऊन केले असून संचारबंदी लागू आहे. प्रशासन कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करत देखील या आवाहनाला न जुमणाऱ्या ४० जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संचारबंदीमुळे अनेकांना जीवनावश्यक वस्तु घेण्याकरीता बाहेर जावे लागते. मात्र काही लोकांना याचे गांभीर्य अजिबात नसल्याचे पाहायला मिळत आहे. काही लोक विनाकारण आपल्या मोटरसायकली घेवून बाहेर ईकडून तिकडे फिरत असल्याचे पॉलिसांच्या निदर्शनास आल्याने भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अश्या तब्बल ४० जणांविरुद्ध नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करू त्यांच्या १६ मोटरसायकली (वाहने ) जप्त केल्या आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी करडी नजर वळवल्याने विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी एका महभागाने चक्क दोन महिन्यापूर्वीची तपासणी फाईल घेऊन फिरण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. पोलीसानीही मग अशांची कोणतीही गय न करता त्यांना वठणीवर आणण्यासाठी थेट गुन्हे दाखल करून अद्दल घडविली आहे. अशाच प्रकारची कारवाई यापुढे सुरूच ठेवली जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिक्षक गजानन राठोड, यांनी म्हंटले आहे.