पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । कोरोना या विषाणूने थैमान घातले असून सर्वत्र लाॅकडाऊन असल्याने नागरिकांना रोजगार नसल्याने शासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून २०२० या तीन महिन्यांकरीता विहीत अन्न धान्य स्वत धान्य दुकानातून देण्यात येत असून त्यानुसार आज पहूर पेठ येथे मोफत धान्य वाटपास सुरुवात करण्यात आली.
शासनाने कोरोनामुळे लाॅकडाऊन केल्यानंतरसरकारी धान्य दुकानावरून तीन महिन्यांकरीता माणसी ५ किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. यानुसार आज अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पहूर पेठ ग्रामपंचायत मधील अरूण बाबुलाल रुणवाल यांच्या स्वस्त धान्य दुकानात पहूर पेठचे सरंपच निताताई पाटील व उपसरपंच श्याम सावळे , रामेश्वर पाटील,राजू जेंटलमॅन यांच्या उपस्थितीत मोफत तांदूळ वाटपास प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार अरूण रुणवाल यांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी व सोशल डिस्टींक्शन पाळण्यासाठी तीन तीन फूट अंतरावर चौकोन तयार करून लाभार्थ्यांना रांगेत उभे केले होते. दुकानात येणाऱ्या लाभार्थ्यांना सँनेटायझर ठेवण्यात आले व प्रत्येकाने तोंडाला मास्क किंवा रूमाल लावून नंबरनुसार मोफत तांदूळ वाटपास सुरुवात करण्यात आली.