Home Cities धरणगाव संचारबंदी : धरणगाव येथे महसूल विभागातर्फे गरजुंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

संचारबंदी : धरणगाव येथे महसूल विभागातर्फे गरजुंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

0
31

धरणगाव, प्रतिनिधी । येथे गरीब नागरिकांचा देशात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जाहीर केलेल्या संचारबंदीच्या काळात रोजगार मिळत नसल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन तहसील कार्यालयातील महसूल विभागातर्फे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

महसूल विभागातर्फे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या प्रमुख उपस्थित गोरबारीबानं जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार प्राथमेश मोहोड, पुरवठा निरीक्षक संजय घुले, पुरवठा अवल कारकून महेश नेहते, लिपिक पंकज शिंदे, कोतवाल तरबेज शेख, बंटी महाजन, वाहन चालक मनोज पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound