भुसावळ, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभाग व राजीव गांधी वाचनालय नसरवांजी फाईलच्या युवकांनी संचारबंदीमुळे शहरात अडकलेल्या दुसऱ्या राज्यातील गरीबांसाठी तसेच शहरातील गरिबांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे.
जाममोहला, मुस्लीम कॉलोनी, पंधरा बंगला व कंडारीच्या टीमने आज लॉक डाऊनमध्ये फसलेल्या युपी, बिहार, राजस्थान व शहरातील गरिबांना जेवणाचे वाटप केले आहे. भुसावळ आयआरटीसीच्या माध्यमातून ५०० नागरिकांना जेवण पुरविले जात आहे. याच प्रमाणे दुसऱ्या गावातील नागरिक व शहरातील नसरवांजी फाईल शक्ती मंजिल समोर, आगाखान वाडा , शिवाजी नगर येथील २५० नागरिकांना जेवण वाटप करण्यात आले. ईब्राहीम खान, साबीर मुस्तुफा, सै. सलीम दस्तगीर, तौसीफ कुऱैशी, अक्तर खान, रफीक पहेलवान शमीम हुबदार, मुस्लिम कॉलोनी, टीम रऊफ ठेकेदार यांनी घोडेपीर दर्ग्याजवळ, हायवे, खडका चौफुली येथे १०० जणांना जेवणाचे वाटप करण्यात आले. कंदरीचे उपसरपंच विशाल खेडकर, राजकुमार ठाकुर ,नितेष ठाकुर, यांनी देखील १०० जणांना जेवणाचे वाटप केले. नदीम अरबच्या टीमने सोना डेअरीच्या पाठीमागे, मुस्लिम कॉलोनी, फकीर वाडा, फुकटपुरा येथे १५० नागरिकांना जेवण वाटप केले. सर्व टिम पदाधिकारी यांचे काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग व राजीव गांधी वाचनालयाचे जिल्हा अध्यक्ष मो. मुनंव्वर खान यांनी आभार मानले आहे.