चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत रोजगार न मिळाल्याने काहींवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजुंना आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे जेवणाचे पाकीट वाटप करण्यात येत आहे.
लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. गरीब जनेतला रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजु नागरिकांना आमदार मंगेश चव्हाण हे दररोज १५०० जेवणाचे पॅकेट वाटप करत आहेत. ही फूड पाकिटे शहरातील प्रभागाचे नगरसेवक, भाजप पदाधिकारी यांच्याहस्ते घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे.