कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे वाहतूक बंद आहे. त्यामुळे जवळपास सर्वच वस्तूंचे भाव थोडयाफार प्रमाणात वाढलेले दिसून आले होते. लॉक डाऊनच्या कालावधीत जीवनाश्यक वस्तूंचीच विक्रीस परवानगी असतांना गुटखा, तंबाखूची विक्री चढया भावाने करण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात पानटपरी, पान मसाला व्यवसाय हा पूर्णपणे बंद आहे. परंतु, जीवनावश्यक वस्तूंच्या आधार घेऊन किराणा दुकानांमधून अवैध पद्धतीने अव्वाच्या सव्वा भावाने गुटखा व तंबाखू होलसेल विक्री करत आहेत त्यामुळे अश्या अवैधपणे व्यवसाय करून जनतेची लूट करणाऱ्या दुकानावर अन्न व औषध,भेसळ विभाग जळगाव यांनी करवाई करावी अशी मागणी नागरिक करित असल्याची चर्चा चौका चौकात सुरू आहे