पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक, सद्गुरू प. पु. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट आरोग्य दत अंतर्गत शहरातील संघवी कॉलनीस्थित दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार सेवा केंद्रात २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य तपासणी शिबिरात श्री. स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर येथील तज्ञ डॉ. नानासाहेब शेवाळे, डॉ. ललिता गभाले यांच्या मार्गदर्शनाखाली हद्यविकार, मधुमेह, ब्लडप्रेशर, काविळ, पोटाचे विकार, अॅनिमिया, संधीवात, मुतखडा, मनोविकार, स्त्रीयांचे आजार, त्वचा रोग, दंत विकार, गर्भाशयाचा कॅन्सर, मुळव्याध, लहान मुलांचे आजार, या सह सर्व जुनाट आजारांवर मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे. या शिबिरास तालुक्यासह परिसरातील रुग्ण आपली आरोग्य तपासणी करुन घेत आहेत. सदरचे आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्राचे आयोजक राम जळतकर, गोकुळ पाटील, डी. पी. वाणी हे अथक परिश्रम घेत आहेत.