जळगाव (प्रतिनिधी) येथील सुरेश लहासे यांची नुकतीच श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र् राज्यच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्याचे खान्देश विभागीय अध्यक्ष संजयकुमार महाजन सर व खान्देश विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण माळी, खान्देश विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी यांनी संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन गुलदगड व प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्तीपत्र देऊन केली. श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन, कार्याध्यक्ष महेंद्र माळी, प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र महाजन, धरणगाव तालुका अध्यक्ष निलेश महाजन, चेतन पाटील तालुका संपर्क प्रमुख धरणगाव, चोपडा शहर अध्यक्ष रोहित माळी, चोपडा तालुका अध्यक्ष समाधान महाजन, धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक महाजन व युवक संघाचे पदाधिकारी यांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.