Home Cities जळगाव श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानतर्फे ओवेसीचा निषेध (व्हिडिओ)

श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानतर्फे ओवेसीचा निषेध (व्हिडिओ)

0
64

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एमआयएम पक्षाचे खासदार अकबरउद्दीन ओवेसी खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीवर गुडघे टेकवून दर्शन घेउन महारष्ट्रात अशांतता पसरविणारे केलेल्या कृत्याचा शिवतीर्थावर श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानतर्फे निषेध करण्यात आला.

 

श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की,  स्वराज्याचा शत्रू औरंगजेब हाच खासदार अकबरउद्दीन ओवेसी यांचा आदर्श असल्याचे सिद्ध होत आहे . ज्या औरंगजेबाने स्वतःच्या भावाची हत्या केली, वडीलाला कैद केल, रयतेवर अमानूष अत्याचार केले, शीखांचे गुरु तेग बहादुर यांचा शिरच्छेद करणाऱ्या, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचे ४२ दिवस अतोनात अत्याचार करुन शिरच्छेद करणाऱ्या, काशीलाउद्ध्वस्त करणाऱ्या आणि ४.९ दशलक्ष हिंदूंची हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या कबरीवर प्रार्थना करणाऱ्या ओवेसीचा जाहीर निषेध आंदोलन हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले हा उदात्तीकरणाचा प्रकार थांबला नाही तर यापुढे मोठे आंदोलन करण्यात येईल तसेच कबर महाराष्ट्रातुन नष्ट करण्यासाठीही मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगितले आहे. त्यावेळी श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख गजानन माळी , श्रीमंत शिवतेज प्रतीष्ठानचे अध्यक्ष दिपक दाभाडे, सचिन सावळे, राहुल चौधरी, सुरेश पाटील, किरण मराठे, पंकज कोळी, मोहन पाटील, अक्षय मराठे, किरण कोळी, ललित पाटील, राज परदेशी, अक्षय कोळी, सागर क्षीरसागर, दिनेश मिस्त्री आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1114083802468241

 


Protected Content

Play sound