Home धर्म-समाज श्री.गो. से. हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

श्री.गो. से. हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

0
61

पाचोरा, प्रतिनिधी ।  पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो. से. हायस्कूलमध्ये  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

 

गो. से. हायस्कूल येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी  शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, भडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक  विश्वासराव साळुंखे, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील, ए. बी. अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख  एस. एन. पाटील, कार्यालय अधीक्षक  अजय सिनकर, एम. एन. देसले व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound