श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत, तर ३ जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
श्रीनगरमध्ये असलेल्या नवगाम येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर ३ जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात एक तरुणही जखमी झाला आहे. जखमींना सध्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर भारतीय जवान परिसरात दहशतवाद्यांच्या शोध घेत आहे.