पाचोरा प्रतिनिधी । रामनवमी निमित्ताने मागील आठ वर्षांपासून कुरंगी येथून साईबाबाच्या शिडी नगरीत गुढीपाडवाच्या दुसऱ्या दिवशी कुरंगी येथून निघून रामनवमीच्या दिवसी सकाळी ही पायीदिडी शिडीत दाखल होते. गावातील व परीसरातील नवतरुण कुरंगी साई मंदीरावर एकत्र येऊन तेथून गावात पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. नंतर साईबाबाचे पादुका पुजन व पालखी पुजनचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आरती करून दिंडीचे प्रस्थान होते. या पायीदिडीला हे नववे वर्ष आहे. दिडीचे एकूण ६ मुक्काम असून सातव्या दिवशी रामनवमीच्या सकाळी दिडी शिर्डीत दाखल होते.
मुक्काम याप्रमाणे राहणार
७ एप्रिल रोजी तारखेडा मुक्काम, ८ एप्रिल ओझर, ९ एप्रिल नस्तनपूर, १० एप्रिल खिडीँ, ११ एप्रिल नगरसूल, १२ एप्रिल कोपरगाव व १३ एप्रिल रोजी सकाळी दिडी शिर्डीत दाखल होते. दरकोस दर मुक्काम करत दिडीला संपूर्ण जेवण व नास्ता पाण्याची व्यवस्था केली जाते. दिडीचे चालक पत्रकार नगराज पाटील, आबा मोरे, सुनिल पाटील, संभाजी शंकपाळ, नामदेव पाटील, कैलास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभते. तर दिडी यशस्वीतेसाठी सरपंच दिपक मोरे, माजी सरपंच गजानन पवार, ज्ञानेश्वर साखरे, परमेश्वर पाटील, विजय ठाकरे, युवराज पवार, सुदाम ठाकरे यांच्यासह गावातील भाविक भक्त परीश्रम घेतात.