शौचालय घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा – नंदकिशोर महाजन (व्हिडिओ)

रावेर, शालिक महाजन | शौचालय घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्ह परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी भाजपा रावेर तालुकाध्यक्ष राजन लासूरकर हे उपस्थित होते.

 

नंदकिशोर महाजन पुढे म्हणाले की, शौचालय घोटाळा ही एक दुर्दैवी घटना आहे. रावेर तालुक्याच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेची खूप मोठी व्याप्ती आहे. या घोटाळ्याबाबत २०२० पासून चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. यात अपात्र लाभार्थ्याच्या नावावर देखील अनेक वेळा अनुदान काढण्यात आले आहेत. याप्रकरणात सद्यस्थितीत दोन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या घोटाळ्यात अजूनही कोणी व्यक्ती, अधिकारी सहभागी आहेत का ? याची चौकशी करण्याची गरज आहे. लाभार्थ्यांच्या यादीवर सक्षम अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी यांची स्वाक्षरी आहे. या शौचालय घोटाळ्यात ग्राम विकास अधिकारी सामील आहेत का याची देखील चौकशी करण्याची मागणी श्री. महाजन यांनी यावेळी केली. याबाबतची तक्रार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया , जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपा तालुका अध्यक्ष राजन लासूरकर यांनी सांगितले की, या घोटाळ्यात दोघांना अटक झालेली असून यातील दोषी अधिकाऱ्यांची देखील चौकशी होवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3206696729652985

 

Protected Content