चाळीसगाव प्रतिनिधी । झाडाखाली पार्किंग करून लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, केंछला सायराम बारेला (वय-२७) रा. पोसपुर पोस्ट सेमली ता फाटी जि. बडवाणी (मध्यप्रदेश) हे दुचाकी (एमपी ४६ एमयू ९९२०) ने औरंगाबाद येथे जाण्यासाठी चाळीसगाव शहरातून ४ जून रोजी दुपारी १२ वाजता निघाले. कन्नड बायपास चौफुलीवर अलीकडे रोडलगत असलेल्या चिंचेच्या झाडाखाली मोटारसायकल लॉक करून ते शौचालयासाठी गेले. त्यानंतर थोड्यावेळाने दुचाकी त्यांना जागेवर दिसून आली नाही. अज्ञात चोरट्यांनी त्यांची लॉक केलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी बारेला यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.