शॉर्ट सर्कीटमुळे किराणा दुकानाला आग

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शॉर्ट सर्कीटमुळे किराणा दुकानाला आग लागल्याची घटना शहरातील गणपती नगरात रविवारी १६ एप्रिल  सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या बंब घटनास्थळी दाखल झाला. या बंबाने आग आटोक्यात आणली. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज जळून खाक झाला.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील लाडवंजारी कार्यालयामागील बाजूस असलेल्या गणपती नगरात खिवसरा यांचे नेहा किरणा जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. रविवारी १६ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे खिवसरा याच्या दुकानाला अचानक आग लागली. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार लागलीच अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांनी फायर फायटर घेऊन वाहन चालक-युसुफ पटेल, फायरमन- पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, वाहन चालक नंदकिशोर खडके, फायरमन संतोष पाटील, मोहन भाकरे यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बंबाद्वारे पाण्याचा मारा करुन ही आग आटोक्यात आणली. आगीत खिवसरा यांच्या दुकानातील मालपुर्णपणे जळून खाक झाला असून त्यांच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

Protected Content