पुणे (वृत्तसंस्था) शॉर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत होरपळून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यु झाल्याची घटना जुन्नर ताक्यातील ओतुर जवळील हमीरघाट येथे घडली आहे.
आगीत चार वर्षाच्या भाग्यश्री कैलास ठाकुर व २ वर्षाच्या शिवा कैलास ठाकुर या चिमुकल्यांना भावंडाना आपला जिव गमवावा लागला आहे. हमीरघाट परिसरातील राहणारे कैलास ठाकुर यांना रात्री अचानक घराशेजारील जनावरांच्या चाऱ्याला अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागत असल्याचे दिसले. त्यात त्यांचीच मूले खेळत असतांना होरपळून मयत झाली. दरम्यान, या आगीत अन्य दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुण्यातील औंध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.