शैक्षणिक शुल्कात मिळणार सवलत : कृषी पदवीधर संघटनेच्या मागणीला यश

पाचोरा, प्रतिनिधी ।  राज्यातील  कृषी व संलग्न पदवीधर विद्यार्थी यांच्या शैक्षणिक शुल्कात कृषी  मंत्री यांनी  कृषी पदवीधर संघटनाच्या तीव्र नाराजी व सोशल मिडिया वरील मोहीमे नंतर “फी माफी” चा निर्णय घेतला आहे अशी माहिती  कृषी पदवीधर संघटना अध्यक्ष मंगल कडूस पाटील यांनी  दिली आहे. असाच निर्णय पदविका विद्यार्थ्यांबद्दल देखील व्हायला हवा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

कृषी पदवीच्या शैक्षणिक शुल्कात मिळावी विषय राज्यात सर्वप्रथम महेश कडूस पाटील यांनी व विद्यार्थी अध्यक्ष मनीष भदाणे पाटील यांनी कृषि मंत्री दादा भुसे यांना भेटून मांडला होता असे श्रीमती कडूस पाटील यांनी सांगितले आहे. याचे सर्व श्रेय कृषि पदवीधर संघटना विद्यार्थी कार्यकर्ते, स्वयंसेवक यांना जाते. दि. २९ जून रोजी कृषी पदवीधर संघटनेने कृषि मंत्री यांना अधिकृत मागणी पत्र दिले. त्यामुळे याचे श्रेय आमच्या विद्यार्थी कार्यकर्ते यांचे आहे अशी प्रतक्रिया संघटनेचे संस्थापक व महासचिव महेश कडूस पाटील यांनी दिली. संघटना परिवारातील अश्विनीकुमार पाटील, हेमंत पवार,  तुषार भुतेकर, ऋषी देवरे,  हर्षल पाटील, गुंजन कुरकुरे, गिरीराज कंखरे,  गौरव गिरासे, अशा अनेक युवती, विद्यार्थी, युवक यांनी निवेदने दिल्यामुळे शासनाला जाग आली असे संघटना अध्यक्ष यांनी सांगितले. श्रीमती कडूस पाटील यांनी राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर विद्यार्थी यांचे व संघटना कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे. कृषि पदवीधर संघटने चा संपुर्ण विजय झाला असे त्या म्हणाल्या आहेत व त्यांनी डॉ. हरिहर कौसडीकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

 

Protected Content