शेळगाव गावातून लोखंडी पाईपाची चोरी;

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  तालुक्यातील नशिराबाद येथील शेळगाव बरेज कॉलनी परिसरातून एकच्या घरातून लोखंडी पाईपांची चोरी करून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार १९ मार्च रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सतीश रघुनाथ पाटील (वय-४६) रा.शेळगाव बॅरेज कॉलनी जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ९ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शेळगाव बारीक कॉलनीतून अज्ञात चोरट्यांनी ८ ते १० फूट लांबीचे लोखंडी पाईप चोरून नेले. ही घटना घडल्यानंतर सतीश पाटील यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु कुठलीही माहिती मिळाली नाही, अखेर शुक्रवारी १० मार्च रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर विसपुते करीत आहे.

Protected Content