चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील खते विक्री व्यापाऱ्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण केल्याने शेतकऱ्यांमध्ये पिळवणूक होत असल्याची भावना निर्माण झाली असून संतापाची लाट पसरलेली आहे. तरी शासनाने तात्काळ लक्ष घालून ही पिळवणूक थांबवावी म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन दिले.
सदर निवेदनात चोपड़ा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झालेल्या असून पिके वाढीच्या अवस्थेत असून युरिया सारखी खतांची अत्यंत आवश्यकता असते. केंद्रसरकार कडून मुबलक युरियाचा पुरवठा झालेला असतांना सुद्धा तालुक्यातील खते विक्री व्यापाऱ्यांनी अश्या अवस्थेत ऐनवेळी कृत्रिम खतांचा तुटवडा निर्माण केल्याने शेतकऱ्यांमध्ये व्यापारींकडून पिळवणूक होत असल्याची भावना निर्माण होवून सर्वत्र संतापाची लाट पसरलेली आहे. तरी शासनाने यात तात्काळ लक्ष घालून होत असलेला अन्याय दूर करवा, आणि खते विकत घेणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापारींनी खतासोबत औषधी व अन्य खतांची खरेदीची सक्ति न करता मुबलक खते उपलब्ध करून द्यावीत. तसेच कृषि केंद्रांवरही रास्त भावाने खते विक्री सुरु करण्यात यावी.
निवेदनावर भारतीय जनता पार्टी चे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, विधान सभा क्षेत्रप्रमुख प्रदीप पाटील, जिल्हापरिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धनंजय पाटील, औद्योगिक वसाहत चेअरमन माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष नरेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, सरचिटणीस मनोहर बडगुजर, रितेश शिंपी, भाजपा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, चिटणीस भरत सोनगिरे, भाजपा अनुसूचित जाती सेल अध्यक्ष राज घोगरे प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे, चिटणीस गणेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या असून निवेदन सादर करतांना सर्व उपस्थित होते.