चाळीसगाव (दिलीप घोरपडे)। शेतकीसंघ व कापूस खरेदी फेडरेशनने शेतकऱ्यांचा कापूस, मका व ज्वारी अग्रक्रमाने खरेदी करावेत, यात होत असणारा घोळ त्वरित थांबवावा या मागणीसाठी आज चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉईंट येथे ठिय्या आंदोलन करून शासनाला जाब विचारला.
यावेळी चाळीसगाव ततालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मनोगतातून व्यक्त केल्यात. शेतकी संघ येथे शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांचा माल बनावट नावाने खरेदी केला जात असल्याचा आरोप करीत शेतकी संघाच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली. या सर्वांना रोख जाब विचारत आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांना खुले आव्हान दिले की, सर्व अधिकारी व कागदपत्रे घेऊन माझ्यासमोर यावे आणि खुलासा करावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
https://www.facebook.com/watch/?v=261640068271436