जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाला देशात विरोध होत असतांना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना बोदवड तालुकातर्फे समर्थ देउन साखर वाटप करत केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले.
केंद्र शासनाने शेती व्यापार सुधारणा विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना काही प्रमाणात शेजाऱ्यांना व्यापार स्वातंत्र देण्याचा प्रयन्त केला आहे.त्यास शेतकरी संघटनेने पाठींबा दिला असल्याचे शेतकरी संघटना बोदवड तालुका जिल्हा प्रमुख दगडू शेळके यांनी म्हटले आहे. या विधेयकाला समर्थन देत संघटनेतर्फे टॉवर चौकांत नागरिकांना साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी खान्देश विभाग प्रमुख कडू पाटील, स्वतंत्र भारत पक्ष जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष ईश्वर लिधुरे, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रविण मोरे, संपर्क जिल्हा प्रमुख नाना पाटील, जळगाव तालुका प्रमुख पंडित अटाळे, रावेर तालुका प्रमुख प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/352067809326035/
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2784341348558305