शेतकरी बांधवांच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी कॉंग्रेसचा शेतकरी मेळावा

 

 

यावल, प्रतिनिधी । केन्द्र शासनाच्या दडपशाहीमुळे देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या काळया काद्याला तात्काळ रद्द करावे या मागणी करीता गेल्या अडीच महीन्यापासुन दिल्ली येथे शेतकरी बांधव हे आंदोलनास बसले असता त्यांना पाठबळ व पाठींबा देण्यासाठी आज यावल येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आल्याचे वक्तव्य कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी केले.

आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी यावल येथे यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या आवारात आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवाच्या संघर्षमय आंदोलनास पाठींबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्याच्या सुरुवातीस दिल्ली येथे आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनात मृत्युमुखी झालेल्या १५५ शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. देशाला स्वातंत्र मिळाले त्या स्वातंत्र चळवळीला कॉंग्रेस पक्षाने एतिहासीक असे संघर्ष करून देशाला स्वातंत्र मिळुन दिले असुन ,आता देखील केन्द्रातील दडपशाही मार्गाने काळे कायद्या करणाऱ्या केन्द्रसरकारच्या तावडीतुन देशाच्या अन्नदाता शेतकरी बांधवांना मुक्त करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे मनोगत कॉंग्रेसच्या मान्यवरांनी व्यक्त केलीत. याप्रसंगी शेतकरी मेळाव्यास उपस्थित तालुक्यातील शेतकरी बांधवांचे तसेच नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले पक्षाचे सदस्य व भावी सरपंच यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आले. या मेळाव्यास माजी आमदार रमेशदादा चौधरी , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान , जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , जिल्हा परिषद सदस्य आर. जी. नाना पाटील , डी. जी. पाटील , श्रीधर चौधरी , राहुल बाहेती, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, नगरसेवक असलम शेख नबी , समीर शेख मोमीन, हाजी गफ्फार शाह, अनुसुचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे , काँग्रेस महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष शबाना तडवी , शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष कदीर खान यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. मेळाव्याची प्रस्तावना प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केली तर सुत्रसंचलन अमोल भिरूड यांनी केले .

 

Protected Content