शेगाव प्रतिनिधी । विदर्भाची पंढरी असलेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या १४२ प्रगटदिन महोत्सवानिमित्त वर्धा येथील रांगोळी संयोजन रमन आर्ट परिवाराच्यावतीने संपूर्ण पालखी मार्गावर आकर्षण अशी रांगोळी काढून श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.
श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने यावर्षी १४२ प्रगटदिन महोत्सव मोठ्या उसाहात साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये आपणही काही तरी केले पाहिजे. याकरिता वर्धा येथील रांगोळी संयोजन रमन आर्ट परिवार २८ ते ३० युवक, युवती यांनी श्री संत गजानन महाराज पालखी दुपारी २ वाजता नगरी परिक्रमा करिता निघाली असता संपूर्ण शहरात नगर परिक्रमा मार्गावर श्रीच्या पालखीची सुरुवात होताच संपूर्ण नगर परिक्रमा मार्गावर आकर्षण अशी रांगोळी संपूर्ण परिक्रमा मार्गावर ५ कि.मी.च्या परिसर दुपारी २ वाजल्यापासून सायंकाळी ६.३० पर्यंत न थांबता रांगोळी काढण्यात आली.
रांगोळीच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा, बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक बंदी, स्वच्छता संदेश, इत्यादी. त्यांनी यापूर्वी वर्धा शहरांमध्ये रामजन्मोत्सव, महावीर जयंती, श्री साई पालखी सोहळा अशा उपक्रमांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी रांगोळी काढले आहे कळंब, देवळी, धोत्रा रेल्वे या ठिकाणीसुद्धा त्यांनी रांगोळी काढले आहे त्यांना श्रीच्या पालखी नगर परिक्रमा मार्गावर ९०० किलो रंगीत रांगोळी, ५०० किलो पांढरी रांगोळी असा १४०० किलो रांगोळी लागली तर श्री गजानन महाराज संस्थान यांनी त्यांना पालखीच्या नगर परिक्रमा मार्गावर रांगोळी काढून दिल्याबद्दल त्यांनी संस्थांचे आभार मानले आहेत.
चौकटीत घ्यावे.
श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आज दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी *रमण आर्ट वर्धा येथील जवळपास तीस कलाकारांनी मिळून रांगोळीसाठी सहभागी कलाकार संचालिका वृषाली हिवसे, चित्रा माकोडे, शुभांगी कुर्जेकर, रुपाली खडतकर, शुभांगी पोहाने, श्रद्धा तिवारी, आचल तिवारी, पूजा तुरणकर, सागर बावणे, चंद्रकांत सहारे, अमोल चवरे, अजय उईके, गौरव डेहनकर, लोकेश भुरसे, आकाश पाटमासे, उमेश काळे, युगा माकोडे, राहुल उमरे, प्रतिक्षा राऊत, सारिका काळे, रमण हिवसे, नंदन हिवसे, कलावती हिवसे, अमित अमृतकर, अमोल हिवसे, डॉ ज्ञानेश ढाकुलकर, वर्षा ढाकुलकर, वैशाली झाडे आदी सहभागी झाले.