जळगाव/रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील उदळी येथील शेतकरी तरुणाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन नफा मिळवून देण्याच्या आमिष देत तरुणाची ९ लाख ३० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उदळी येथे भूषण दत्तात्रय बऱ्हाटे वय ३९ हा तरुण वास्तव्यास आहे. १४ डिसेंबर २०२२ ते १ एप्रिल २०२३ दरम्यान अजय व निखिल या दोन नावाच्या वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन भूषण बऱ्हाटे यास वेळावेळी फोन केला, तसेच orion fx robo या या कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा प्रमाणात नफा मिळेल, अशी बतावणी फोनवर बोलणाऱ्या दोघांनी भूषण यास केली, तसेच त्याचा विश्वास संपाद करत orion fx robo या नावाचे ॲप्लीकेशर भूषण यास डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर शेअर खरेदी करण्यासाठी भूषण याच्याकडून वेळावेळी एकूण ९ लाख ३० हजार रुपये ऑनलाईन स्विकारले. माऋ त्या बदल्यात भूषण यास नफाही मिळाला नाही व मुद्दल रक्कम संबंधितांनी परत केली नाही, आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर दोन दिवसानंतर भूषण बऱ्हाटे याने याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन फोन बोलणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोक उतेकर हे करीत आहेत.