मुंबई (वृत्तसंस्था) सेन्सेक्स नियंत्रणाबाहेर पडल्यामुळे सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत ‘बीएसई’मधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. परंतू सव्वादहानंतर वाजता पुन्हा एकदा शेअर बाजारातील ट्रेडिंग सुरु झाल्यानंतर मात्र, कोसळलेला निर्देशांक पुन्हा हळू हळू वर यायला सुरुवात झाली आहे.
मुंबई शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक पडझड झाल्यामुळे व्यवहार एक तासासाठी बंद करण्याची वेळ ओढावली . शेअर बाजार उघडताच निर्देशांकात 3100 अंकांनी घसरण होऊन तो 30 हजारांच्या खाली गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शेअर बाजार उघडतास सेन्सेक्स 3100 अंकांनी कोसळून 30 हजारांच्या खाली गेला होता. निफ्टीमध्येही 900 अंशांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली. सव्वादहानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक हळूहळू उभारी घेताना दिसला. शिवाय राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही वाढ होताना दिसत आहे. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्समधील घसरणीचा आकडा 3300 वरुन 1300 वर पोहोचला. मग सकाळी 10.50 वाजता सेन्सेक्सने भरारी घेत 568 अंकांनी उसळी घेतली. सर्किट लागले तेव्हा सेन्सेक्स 29687.52 इतका होता, त्यामध्ये वाढ होऊन 11 च्या सुमारास तो 33112 अंकांवर गेला.