शेंदूर्णी येथील डॉ. अनिकेत सुर्वे यांचे सुयश

 

शेंदुर्णी, प्रतिनिधी । येथील  डॉ. अनिकेत सुर्वे यांची नुकत्याच झालेल्या एआयपीजीइटी परीक्षेत एम. एस. शल्य तंत्र या विषयात उच्च शिक्षणासाठी सांगली येथील श्री. अण्णासाहेब डांगे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट & रिसर्च सेंटर येथे शासकीय कोट्यातुन निवड झाली आहे.

डॉ. अजय सुर्वे यांचे सुपुत्र डॉ. अनिकेत सुर्वे  यांनी कोरोना काळात वडिलांसोबत शेंदुर्णी येथे दिलेल्या सेवेनंतर मिळालेले हे यश उत्तुंग आहे. आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड महाविद्यालयाचे डॉ. सुर्वे हे माजी विद्यार्थी आहेत. या निवडीबद्दल गावातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

 

Protected Content