शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी) । दिल्ली येथील नॉर्थ ब्लॉक येथे उपनिदेशक म्हणून शेंदुर्णी येथील राहुल गरूड (ICAS)यांनी नियुक्ती करण्यात आले आहे. महत्वाची म्हणजे संपूर्ण देशाचे (पावर हाऊस) समजल्या जाणाऱ्या नॉर्थ ब्लॉकमध्ये फडकवल्याबद्दल राहुल गरुड यांचे अभिनंदन होत आहे.
आपल्या कार्यकुशलतेने आणि कार्यक्षमतेने अगदी कमी कालावधीत राहुल गरूड हे भारत सरकारच्या गृहमंत्रालयात असिस्टंट कंट्रोलर ऑफ अकाउंट्स या पदावर राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे आणि कार्यतत्परतेने पार पाडल्या.
सीमा सुरक्षा दलासह( BSF) देशाच्या निम्म्याहून अधिक पॅरामिलिटरी फोर्स ज्यांना आपण सध्या सेंट्रल आर्मड पोलीस फॉर्स (CAPF) म्हणून ओळखतो. त्यांच्या आर्थिक (वित्तीय) आणि लेखापरीक्षण संबंधित विभागाचे यशस्वी नेतृत्व केले. प्रामाणिकपणे आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने कामे करुन आपला नावलौकिक त्या विभागात प्रस्थापित केला आणि ह्या सर्व कर्तबगारीचा परिणाम म्हणून राहुल गरुड यांची पदोन्नती झाली.
आता भारत सरकारच्या वित्त मंत्रालयात (नॉर्थ ब्लॉक दिल्ली) येथे उप निदेशक (आर्थिक कार्य विभाग) म्हणून अत्यंत महत्वाची आणि मोठी जबाबदारी सांभाळतील. सोप्या भाषेत सांगायचे तर राहुल गरूड हे आता संपूर्ण देशाचे बजेट (अंदाजपत्रक) मध्ये महत्वाची भूमिका निभावतील. शेंदुर्णी, जळगाव, खान्देश नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची बाब आहे. एक मराठी नाव आता देशाच्या ध्येय निश्चितीत आणि धोरणांच्या आखणीत सहभागी असेल राहुल दिलीपराव गरूड यांच्यामुळे शेंदूर्णी करांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याबद्दल शेंदूर्णी कर नागरिक व संपूर्ण गरुड परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.